*कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी आय टी आय चे एक पाऊल पुढे......* ============== *स्कुल कनेक्ट सप्ताह साजरा....* ============== अमरावती विभागातील सर्व माध्यमिक शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील उपलब्ध व्यवसाय अभ्यासक्रम त्याची उपयुक्तता,रोजगार स्वयं रोजगाराच्या संधी, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राप्त केलेले संपूर्ण कौशल्य, विभागाच्या विविध योजना याबाबतची सविस्तर माहिती शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कुल कनेक्ट वीक कार्यक्रमात देण्यात आली.विद्यार्थ्यामध्ये व्यवसायभिमुख अभ्यासक्रम व तंत्र प्रशिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी २०२३ या प्रवेश सत्रापासून प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत अधिक भर पडून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावा या उद्देशाने खात्याच्या प्रधान सचिव मा. मनीषा वर्मा व राज्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक माननीय दिगंबर दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार व सह संचालक मा.प्रदीप घुले यांच्या अंमल मध्ये दिनांक १२ डिसेंबर ते १६ डिसेंबर २...
Posts
- Get link
- X
- Other Apps
*कृषी महोत्सव : शेतकरी ते ग्राहक नाते दृढ करण्याचा संकल्प.....* ============== ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तीन वर्षाच्या कालावधी नंतर अमरावती जिल्ह्यात शांती इव्हेंट मॅनेजमेंट व युवा स्वाभिमान या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दि १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०२३ या दरम्यान जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवासाठी सायन्स कोअर मैदानावर गेल्या चार दिवसा पासून शेतकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक संघटना युवा स्वाभिमानच्या वतीने या कृषी महोत्सवाचे हे ४ थे वर्ष होते.या चार दिवसात हजारो शेतकरी बांधवानी आपल्या कुटुंबासमवेत या आगळ्या वेगळ्या महोत्सवाला आपली हजेरी लावली. या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने चार दिवस कृषी क्षेत्रातील पंढरी अवतरली होती. देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलावे त्यांची जीवन्नोती व्हावी यासाठी राज्य व केंद्रसरकार अशा शेतकरी महोत्सवाचे नेहमीच आयोजन करीत असते.त्याचाच एक भाग म्हणून या महोत्सवात शेती व्यवसायाशी संबंधित विविध छोटे मोठे १७५ स्टॉल्स उपलब्ध होते.त्यामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करताना लागणारे बी बियाणे...
- Get link
- X
- Other Apps
शिवजयंतीचे महात्म्य .... रवींद्र दांडगे झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती तुम्ही...!! रयतेचा राजा म्हणजे आपला राजा. जी आज लोकशाही तीच शिवकालीन शिवशाही ही किती प्रगत? शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ चालवायचे लोकप्रशासन, ज्यामध्ये कोणत्याही कुरापती कारवाया करायला अधिकाऱ्याजवळ जागा नव्हती. रयतेचं राज्य म्हणजे रयतेने रयतेच्या कल्याणासाठी चालविलेलं राज्य. आजही लोकशाही मध्ये तेच सुरु आहें पण हलक्या कानाचे राज्यकर्ते राज्य चालविताना या बाबी गंभीरतेने घेत नाहीत. जणू ही नित्याची बाब होऊन बसली आहें. उद्या वसंत ऋतूचा प्रारंभ. छत्रपती शिवरायांची तारखेप्रमाणे जयंती साजरी होत आहें. आम्ही शालेय शिक्षण घेत असताना तेव्हाचे शिक्षक इतिहासाच्या तासाला आमच्या पुढे संपूर्ण इतिहास जिवंत करायचे. त्या गोष्टी आजही आमच्या मनात ठसठसून भरल्या आहेत. आजच्या पिढीला नवीन भारत घडवायचा असेल तर बाळबोध थोर महापुरुषांच्या कर्तव्य गाथा मधूनच प्राप...