- शिवजयंतीचे महात्म्य.... रवींद्र दांडगे
झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही...!!
रयतेचा राजा म्हणजे आपला राजा. जी आज लोकशाही तीच शिवकालीन शिवशाही ही किती प्रगत? शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ चालवायचे लोकप्रशासन, ज्यामध्ये कोणत्याही कुरापती कारवाया करायला अधिकाऱ्याजवळ जागा नव्हती. रयतेचं राज्य म्हणजे रयतेने रयतेच्या कल्याणासाठी चालविलेलं राज्य. आजही लोकशाही मध्ये तेच सुरु आहें पण हलक्या कानाचे राज्यकर्ते राज्य चालविताना या बाबी गंभीरतेने घेत नाहीत. जणू ही नित्याची बाब होऊन बसली आहें. उद्या वसंत ऋतूचा प्रारंभ. छत्रपती शिवरायांची तारखेप्रमाणे जयंती साजरी होत आहें. आम्ही शालेय शिक्षण घेत असताना तेव्हाचे शिक्षक इतिहासाच्या तासाला आमच्या पुढे संपूर्ण इतिहास जिवंत करायचे. त्या गोष्टी आजही आमच्या मनात ठसठसून भरल्या आहेत. आजच्या पिढीला नवीन भारत घडवायचा असेल तर बाळबोध थोर महापुरुषांच्या कर्तव्य गाथा मधूनच प्राप्त होऊ शकतो असं मला वाटते. तानाजी चित्रपट थियेटर मध्ये सहकुटुंब बघताना चिमुकलेही हर्षोल्हासित होतात. हेच या इतिहासाचे गमक आहें.
तिथी आणि तारीख यांच्या गराड्यात न पडता छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहाने कशी साजरी करता येईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. नवीन पिढी पुढे शिवरायांचा खरा इतिहास कसा मांडता येईल याचे फलित प्राप्त होने आवश्यक झाले आहें. जय शिवाजी, जय शिवराय....
रवी दांडगे.

very fine
ReplyDelete